अखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने दौंड मध्ये तहसीलदारांना निवेदन

दिनेश पवार,दौंड

कोरोना चा प्रभाव कमी होऊ लागल्यामुळे सर्वत्र जनजीवन पूर्वपदावर येत आहे, बाजारपेठा, हॉटेल, मॉल उघडले आहेत, राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलने चालू आहेत. त्यामुळे शासनाने कलाकारांचाही विचार करून त्यांना त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आवश्यक ती नियमावली देऊन परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय महा संघ दौंड शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करून करण्यात आली आहे,यावेळी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मागील दीड वर्षापासून लॉक डाऊन मुळे कलाकारांना काम नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, सध्या महाराष्ट्रासह दौंड मध्ये ही कोरोना आटोक्यात येत आहे. सर्वांचेच व्यवहार पूर्वपदावर येवू लागले आहेत. त्याच प्रमाणे येथील कलाकारांनाही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बँड ,बँजो पथकांना वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी. सरकारने कलाकारांसाठी मंजूर केलेली 5 हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी आहे, कलाकारांना किमान 10 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत शासनाने करावी, दरमहा 10 हजार रुपयांची पेन्शन कलाकारांना देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

या वेळी महासंघाचे अध्यक्ष( दौंड) भारत सरोदे, संतोष माने, चंद्रकांत लोंढे, संजय जाधव, दत्तू घोडे, जगदीश गायकवाड, राजू आढाव, प्रवीण गरुडकर, तानाजी जाधव, अनिल जाधव, संतोष गायकवाड, शाकीर शेख आदी उपस्थित होते.

Previous articleएक राखी सैनिकांसाठी दुर्गा वाहिनी शिरोली शाखेचा अनोखा उपक्रम; सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवल्या १००० राख्या
Next articleलीळाचरित्र ग्रंथाला पर्यायी शब्द देऊन वाचकांना श्रीभास्करपाठ ग्रंथ नव्याने प्रकाशित – महंत कृष्णराज शास्त्री