एक राखी सैनिकांसाठी दुर्गा वाहिनी शिरोली शाखेचा अनोखा उपक्रम; सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवल्या १००० राख्या

राजगुरूनगर – राखी पौर्णिमेला बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करत असते हे रक्षा बंधन भाऊ सैदव आपलं रक्षण करण्यासाठी आणि बहिण-भावंडांमधील प्रेम जिव्हाळा कायम ठेवण्यासाठी बांधले जाते.परंतु सीमेवर आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांना ना कुठला सण साजरा करता येतो ना कुठल्या समारंभात सहभागी होता येते.भारतमातेच रक्षण करण्याची यशस्वी जबाबदारी सेनेने आपल्या खांद्यावर घेतलेली असते.भारतीय सेनेच आपण सदैव ऋणी आहोतच.भारतीय जनता आणि सेना यांच बंधुत्वाच नात आहे.हेच नात आज वृद्धिंगत करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल, मनोधैर्य कमी न होता ते वाढविण्यासाठी विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनीने अनोखा उपक्रम राबवला असून राखीद्वारे आपल्या भावना सेनेपर्यत पोहोचाव्यात यासाठी ‘एक राखी भारतीय सेनेची ‘ हा उपक्रम राबविला आहे.

या द्वारे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल दुर्गा वाहिनी खेड तालुक्याच्या वतीने १००० राख्या भारतीय सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या अनोख्या उपक्रमाचे कौंतुक होत आहे.

Previous articleअखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने दौंड मध्ये तहसीलदारांना निवेदन
Next articleअखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने दौंड मध्ये तहसीलदारांना निवेदन