मार्केटिंग व्यवस्था राबवण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांना भेट

 अमोल भोसले,उरुळी कांचन- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे महाराष्ट्र शासन अंगीकृत कृषी पर्यटन विभाग, कृषी विभाग हवेली पुणे, पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुक्यातील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रांना अभ्यास दौरा व मार्केटिंग व्यवस्था राबवण्यासाठी प्रत्यक्ष शेतावर भेट दिली.

यामध्ये तनमन आयुर्वेदिक कृषी पर्यटन केंद्र, मु, खाटपेवाडी मुळशी, निसर्गरम्य २६ एकर क्षेत्रावर ऑरगॅनिक शेती व्यवस्थापन, २००, देशी गाईचे संगोपन करून, दुधाला प्रक्रिया उद्योग चालू केला आहे. त्यामध्ये चिज, पनीर, तुप, दुध त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी कॉपशॉप मध्ये सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर्स कडून योग्य मार्गदर्शन करून आयुर्वेदिक ट्रिटमेंट पंचकर्म दिले जाते यामुळे या कृषी पर्यटन केंद्रावर देश तसेच परदेशातील जास्त पर्यटन येतात.

अभिजित माळवदकर व कृष्णाई कृषी पर्यटन केंद्र हे टेमघर धरण परिसरात निसर्गरम्य ठिकाण आहे. पुणे मुंबई शहरातील नागरिकांना तीनही कृषी पर्यटन केंद्र एकाच मार्गावर आहेत यामुळे पर्यटन चांगल्या प्रकारचे गावरान जेवण, सहासी खेळ, जंगल ट्रॅकिंग उपलब्ध आहे.

या कार्यक्रमात हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, मंडल कृषी अधिकारी गुलाब कडलग, कृषी सहाय्यक महेश सुरडकर, कृषी पर्यटन विभागाचे प्रमुख बाळासाहेब सोळांकुरे पाटील व सहाय्यक शिल्पा साठे यांनी सर्व दौर्यावर मार्गदर्शन केले.

Previous articleवैद्यकीय सेवेत डॉ.रवींद्र भोळे यांचे काम आदर्श – नंदकुमार मुरकुटे
Next articleचाकण पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्पाला मिळाले जिवदान