चाकण पोलीसांच्या सतर्कतेमुळे सर्पाला मिळाले जिवदान

चाकण- स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चाकण पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजुला झुडपांमध्ये साप दिसल्याची माहिती पोलीस नाईक हनुमंत कांबळे यांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे प्रशिक्षित सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे यांना कळविली त्यांनी रेस्क्युअर शांताराम गाडे यांच्यासह जाऊन घोणस जातीचा साप ताब्यात घेतला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची सापांच्या बाबतीत माहितीची गरज व जिज्ञासा लक्षात घेऊन तिथेच उपस्थित असणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना घोणस सापाची शास्त्रीय माहिती घेतली तसेच साप सुरक्षित पकडून सोडून कसे द्यावे याचे प्रात्यक्षिक दिले.यावेळी अनेक अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी सापाविषयी माहिती मिळवण्यात रस दाखवला. अगदी महिला अधिकाऱ्यांनी देखील सापाला सुरक्षित हाताळले.

यावेळी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक अनिल देवडे डिटेक्शन ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे,आणि अंमलदारांनी सर्पमित्रांचे आभार मानले.यानंतर लगेचच वनविभागात सापाची नोंद करून जंगलात सोडून देण्यात आले. शासनाच्या अनेक खात्यातील कर्मचाऱ्यांचा सापाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध येतोच मग ते वनविभाग असो,महावितरण, पोलीस खाते, कृषी विभाग, महसूल खाते, वनविभाग, इत्यादी खात्यातील कर्मचाऱ्यांना कर्तव्य करताना कधी ना कधी सापाचा संपर्क येतोच त्यांची कधी ना कधी सापाची गाठ पडते. सर्वांनाच समोर दिसणारा किंवा अडचणीत सापडलेला साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देणे शक्य नसते. किंबहुना बऱ्याच जणांचं त्याबाबतीत प्रशिक्षणही झालेलं नसतं.परंतु प्रशिक्षित सर्पमित्र सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देतात.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण वनविभागा मार्फत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने असे प्रशिक्षित सर्पमित्र काम करत आहेत.यामध्ये प्रामुख्याने नेचर गार्ड ऑर्गनायझेशन व वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचा नामोल्लेख करावा लागेल चाकण वन विभागाचे आर. एफ.ओ योगेश महाजन यांच्या पुढाकाराने तालुक्यातील जवळ जवळ 42 सर्पमित्रांना विशिष्ट ड्रेस, बूट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. वनविभागाला देखील सर्पमित्रांची खूप मदत होत आहे.

यावेळी चाकण वन विभागाचे आरएफओ योगेश महाजन यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांनी देखील साप ओळखणे गरजेचे आहे तसेच तरुण पिढीने आपली वन्यजीव संपदा वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी वन्यजीवांच्या बाबतीत आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे व वेळोवेळी प्रशिक्षण घ्यावे.

Previous articleमार्केटिंग व्यवस्था राबवण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांना भेट
Next articleराजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी कळसूबाई शिखरावर स्वातंत्र्य दिनी फडकावला तिरंगा