महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरोलीमध्ये कोरोना योध्दांचा सन्मान

राजगुरूनगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा शिरोलीच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात चांगले काम केलेल्या वैदयकिय कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी,खेड तालुका सचिव नितीन ताठे,आळंदी शहरध्यक्ष अजय तापकीर, खेड तालुका उपाध्यक्ष सनी दौंडकर, शिरोलीच्या सरपंच सौ संगीता केदारी उपसरपंच अलका शिनकर, माजी उपसरपंच जितुभाऊ वाडेकर, माजी उपसरपंच दादा देवकर, माजी उपसरपंच सौ जयाताई दजगुडे, माजी उपसरपंच सौ हिराताई वाळुंज, उद्योजक दत्ताभाऊ वाळुंज ,कुलस्वामिनी पतसंस्था अध्यक्ष देवराम वाडेकर, नवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय एकनाथ सावंत, मनसे शिरोली शाखेचे अध्यक्ष बारकू पवळे,राजेंद्र शिनकर, महेंद्र शिनकर सचिन मलघे उपस्थित होते.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ पूनम चिखलीकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ स्वाती पवार,आरोग्य सहाय्यक भुषण भारती,आरोग्य सेवक अतिश काळबांडे,आरोग्य सेविका सौ छाया नेवसे,आशा गट प्रवर्तक सौ सोनाली सावंत, आशा वर्कर सौ जयश्री सावंत ,आशा वर्कर सौ पूनम पवळे तसेच शिरोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सदाशिव आढाव,ग्रामपंचायत लिपिक सागर वाडेकर यांना कोरोना योध्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन मनवीसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत यांनी केले.

Previous articleराजगुरुनगर येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने संर्पमित्रांचा सन्मान
Next articleस्तुत्य उपक्रम | निलेश जरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण