स्तुत्य उपक्रम | निलेश जरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

राजगुरूनगर- युवा नेते निलेश जरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जरेवाडी गावात वृक्षारोपण करण्यात आले आजच्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकीचे भान जपत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी यशोदा सामाजिक संस्थाच्या अध्यक्ष रुपाली ताई राक्षे,नितीन भाऊ राक्षे,सचिन जरे ,नितीन जरे ,चेतन शेठ पिंगळे,प्रदीप जरे ,मारुती राक्षे , गौतम जरे ,संतोष जरे , विकास जरे ,गणेश पवळे ,प्रवीण जरे ,विनायक जोरी ,ऋतिक जोरी , रितेश जरे ,दाते साहेब, रोहिदास जोरी ,संतोष जरे, काळूराम करंडे ,अंकुश जरे ,हछावा कार्याध्यक्ष जयाताई नाईकरे ,सिमा ताई बोंबले, नमिता वायाळ आदी उपस्थित होते

वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याने हे समाजाने लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षाची लागवड ही आपल्या लेकरा प्रमाणे करावी.वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील.

रूपाली राक्षे अध्यक्ष

यशोदा सामाजिक संस्था

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरोलीमध्ये कोरोना योध्दांचा सन्मान
Next articleस्पार्क मिंडा फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत दोंदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण