राजगुरुनगर येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने संर्पमित्रांचा सन्मान

राजगुरुनगर – खेड तालुक्यात जिवाच्या बाजीवर खेळून अडचणीच्या जागेत व घरांमध्ये असलेल्या सर्पांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडून देत त्यांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांचा नागपंचमी सणा निमित्त राजगुरुनगर येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळ (वाडा रोड) यांच्या वतीने सन्मान करण्यात आला

लोकसेवेसाठी व सर्पाच्या प्रेमा खातीर जीव धोक्यात घालून काम करणारे खेड तालुक्यातील देवराम शिंदे, महेश कोळेकर, ब्रिजेश गायकवाड , सौ प्रिया गायकवाड , चेतन गावडे, रोहित मुळुक, सुमित सुरेश घुमटकर, चैतन्य सातपुते, निलेश वाघमारे, जीवन इंगळे, सागर कोहिणकर, सौरभ सावंत, ऋषी पाचारणे, अक्षय मालप इत्यादी सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अॅड निलेश आंधळे यांनी केले. सर्पमित्रांना मधुकर गिलबिले गुरुजी ,रणजित करंजखिले यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अमित घुमटकर,योगेश पवार, संतोष भांगे, नरेंद्र वाळुंज, राम पाटील, श्रेयश सरवदे , राजेश लांडे आदी उपस्थित होते.सर्पमित्र सौ. प्रिया गायकवाड यांनी रेस्क्यू करताना काळजी व विविध प्रसंगातून सापांबद्दल जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले

Previous articleनारायणगाव जेष्ठ नागरिक संघाच्या नूतन कार्यकारणीवर आक्षेप
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरोलीमध्ये कोरोना योध्दांचा सन्मान