नारायणगाव जेष्ठ नागरिक संघाच्या नूतन कार्यकारणीवर आक्षेप

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी गेले अनेक वर्षे कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाच्या नुकत्याच जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणीवर जुन्या ज्येष्ठ नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाच्या झालेल्या एका बैठकीत केवळ २० ते २५ जणांमध्ये निवडलेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीवर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आक्षेप घेत नवीन कार्यकारिणीला विरोध केला आहे.

याबाबत नाव न छापण्याच्या व जाहीर न करण्याच्या अटीवर काही जेष्ठ नागरिकांनी सांगितले की, सुमारे बाराशे सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना विश्वासात न घेता तसेच covid-19 च्या पार्श्वभूमीवर कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव पाहता फेस्काँमच्या कोणत्याही नियमानुसार बैठक किंवा मीटिंग घेता येत नाही तसेच जुन्या कार्यकारिणीने आपापसात संगनमत करून सभासदांना विश्वासात न घेता ही निवड केली आहे. नवीन संचालक मंडळ सोमवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, बाराशे सभासद असताना त्यांना विश्वासात न घेता केवळ २० ते २५ जणांमध्ये कार्यकारी निवडण्याचे अधिकार यांना कोणी दिले म्हणून नियमाला बगल देणाऱ्या व बेकायदेशीररित्या केलेल्या निवडीला अनेक सभासदांचा आक्षेप आहे.

Previous articleकोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य तसेच देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी दृढसंकल्प होऊया – अजित पवार
Next articleराजगुरुनगर येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने संर्पमित्रांचा सन्मान