टेमघर येथील गरजू कुटुंबांना संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्याचे वाटप

टेमघर (ता.मुळशी ) येथील ग्रामपंचायत अंतर्गत मुऱ्हा व खरब येथील धनगर वस्ती मधील 20 कुटुंबांना धान्य किट,चटई, ब्लॅंकेट,,डिजल, सोलापुरी चादर व साडी इत्यादीसह संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्याचे वाटप शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गुंड यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना मुळशी तालुका विभाग प्रमुख राजेंद्र गुंड व माती गणपती मंडळ ट्रस्ट नारायण पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आझाद मयूर मित्र मंडळ गुजरात कॉलनी कोथरूड पुणे यांच्या वतीने सर्व कुटुंबात डिजल व ताडपत्री देण्यात आले.यावेळी शिवसेना पुणे जिल्हा उपसंघटक सचिन दगडे ,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी आप्पा उभे शिवसेना मुळशी तालुका उपसंघटक अमित कुडले यांच्या हस्ते लाभार्त्यांना वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रेय काळभोर, वेगरे चे आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे ,म्हसवेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश चवले, नवनिर्वाचित युवासेना तालुका प्रमुख दत्तात्रय झोरे ,भुगावचे उपसरपंच विशाल भिलारे, रामदास कुंभार ,समीर शिंदे टेमघर च्या सरपंच रेणुका मरगळे, उपसरपंच सचिन मरगळे ,अंकुश मरगळे, निलेश दुडे , रामचंद्र मरगळे रवींद्र गुंड, सुभाष कानगुडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब मरगळे यांनी तर आभार सरपंच रेणुका मरगळे यांनी मानले.

Previous articleकाळेवाडी साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी
Next articleपुणे-नाशिक महामार्गावर वडाची फांदी उन्मळून पडली;संबंधित विभागाचे दुर्लक्ष