संदेश वाळके यांची खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

राजगुरूनगर- खेड तालुका भाजपाच्या वतीने भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी किवळे येथील युवा नेते संदेश वाळके यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष शांताराम भोसले यांच्याहस्ते देण्यात आले .

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील,भाजपा युवा मोर्चा खेड तालुका अध्यक्ष काळूराम पिंजण, राजनभाई परदेशी, क्रांतीताई सोमवंशी, शिवाजीराव मांदळे, संजय रौधळ, सुनिल देवकर, संदेश जाधव, राहुल येवले, प्रितम शिंदे, शिवाजी भुजबळ तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संदेश वाळके म्हणाले की, आगामी काळात सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू मानुन, विकासात्मक काम करुन खेड तालुक्यात भाजपा पक्ष आणि भाजपा पक्षाची विचारधारा सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत, पोहचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

Previous articleशहिद स्मारकास पंजाब येथील देशभक्त विजय सागर यांची भेट
Next articleबारामती येथे झालेल्या प्रशिक्षणात खेड तालुक्यातील ‘या’ पाच गावच्या सरपंचाचा सहभाग