शहिद स्मारकास पंजाब येथील देशभक्त विजय सागर यांची भेट

राजगुरूनगर-पंजाब जालंधर येथील देशभक्त ,विजय सागर यांनी राजगुरुनगर येथील हुतात्मा स्मारक येथे नुकतीच भेट देऊन शहीद भगतसिंग, राजगुरू , सुखदेव यांना अभिवादन केले.यावेळी त्यांचा यथोचित सन्मान केला.

देशभक्त विजय सागर यांनी आपले संपूर्ण जीवन फक्त देशभक्ती साठी दिले असून वर्षभर ते देशातील शहीद स्मारक,शहीद वंशज,याना भेटी देतात.देशभक्ती विचार प्रचार प्रसार करतात..गेली अनेक वर्ष कधी सायकल, रेल्वे ,बस यातून सतत देशभर प्रवास करत असतात.राजगुरूनगर येथे ते गेली अनेक वर्ष भेट देत आहेत.

यावेळी हुतात्मा राजगुरू भगतसिंग ,सुखदेव न्यास राजगुरूनगर संस्थेचे अध्यक्ष मधुकर गिलबिले यांच्या हस्ते विजय सागर यांचा सन्मान करण्यात आला.नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान संस्थापक अशोक दुगड उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबिण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल विजय सागर यांच्याशी चर्चा झाली.

Previous articleस्व.स्वप्नील कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धेचे आयोजन
Next articleसंदेश वाळके यांची खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती