इयत्ता 9वी व 11वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यासाठी मुख्याध्यापक संघ महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याला यश

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

इयत्ता 9 वी व 11वी मध्ये सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांची फेरपरीक्षा घ्यावी यासाठी मुख्याध्यापक संघ महामंडळाने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कोरोना परिस्थिती मुळे राज्यात यावर्षी विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा होऊ शकल्या नाही त्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार पहिले सत्र व अंतर्गत मूल्यमापना नुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहे, यात 9वी व 11वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार होती परंतु सध्या कोविड-19,कोरोना परिस्थितीमुळे शाळा नेमक्या कधी सुरु होतील हे अनिश्चित आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्याध्यापक संघ महामंडळाने शासनाकडे पाठपुरावा केला होता यावर विचार करून आता या विद्यार्थ्यांना एक संधी दिली जाणार आहे, दि.7 ऑगस्ट 2020 पर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे फेर तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे,या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

Previous articleखडकाळ व मुरमाड जमिनीवर सागर काचोळे या तरूणाने फुलवली फळबाग
Next articleदौंड तालुक्यात ग्रामीण भागात आज कोरोना चे पाच रुग्ण