खडकाळ व मुरमाड जमिनीवर सागर काचोळे या तरूणाने फुलवली फळबाग

चाकण-दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत असून हा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे त्या उद्देशाने खेड तालुक्यातील रोहकल येथील सागर काचोळे या तरूणाने लाँकडाऊनच्या काळात आपल्या दोन एकरमध्ये खडकाळ व मुरमाड जमिनीत शेतात सीताफळ ,शेवगा, पेरू, अशा बाराशे फळझाडांची लागवड केली आहे.

कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला उपयोगी पडेल असं जर काही घेण्यासारखं असेल तर ते नक्की घ्यावं या उद्देशाने त्यांनी हे काम केले आहे. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र खेड अंतर्गत काम करत असताना वृक्ष लागवडीची आवड त्यांना निर्माण झाली त्यापासून मिळणारे फायदे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी त्यांच्या जमिनीत सीताफळ शेवगा पेरू अशा सुमारे बाराशे फळझाडांची लागवड केली यासाठी सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्री.बुरसे साहेब,श्री.इथापे साहेब व कृषी सहाय्यक फलके यांचे मार्गदर्शन मिळाले.

Previous article‘जुन्नर टाइम्स’ चा संपादक संदीप उतरडे याला सात दिवसांची पोलीस कोठडी
Next articleइयत्ता 9वी व 11वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यासाठी मुख्याध्यापक संघ महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याला यश