‘जुन्नर टाइम्स’ चा संपादक संदीप उतरडे याला सात दिवसांची पोलीस कोठडी

नारायणगांव- खोटी बातमी दाखवून खंडणी उकळणाऱ्या तथाकथित युट्युब चॅनेल च्या संपादकावर गुरुवार दिनांक २३ जुलै २०२० रोजी भा.द. वि. कलम ३८४, ४६५, ४६९, ५००, ५०१, ३४ प्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी ‘जुन्नर टाइम्स’ या युट्युब चॅनेल चा संपादक संदीप पांडुरंग उतरडे (वय ३०, राहणार आपटाळे, तालुका जुन्नर) व कार्यकारी संपादक सचिन जाधव वय (वय ३२, पत्ता माहीत नाही)  या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची फिर्याद सचिन कृष्णाचंद ठाकूर वय २८ रा. नारायणगाव यांनी नारायणगाव पोलिसांत दिली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पांडुरंग उतरडे याला नारायणगाव पोलिसांनी आज जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
उतरडे याच्यावर यापूर्वी आळेफाटा आणि जुन्नर पोलीस स्थानकात वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल असल्याचे समजते. तसेच उतरडे हा तथाकथित आरटीआय कार्यकर्ता आहे.

Previous articleज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी-उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleखडकाळ व मुरमाड जमिनीवर सागर काचोळे या तरूणाने फुलवली फळबाग