दौंड तालुक्यात ग्रामीण भागात आज कोरोना चे पाच रुग्ण

दिनेश पवार -दौंड (प्रतिनिधी)
दौंड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावात आज दिवसभरात एकूण पाच रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याची माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली, डॉ.अशोक रासगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात बोरिपारधी-एक(महिला),खुटबाव-एक(पुरुष),ताम्हणवाडी-एक(पुरुष),उंडवडी-एक(महिला),जावजी बुवाचीवाडी-एक(पुरुष) असे एकूण पाच रुग्ण सापडले आहेत, यामध्ये दोन महिला व तीन पुरुष यांचा समावेश आहे.दौंड शहरात व तालुक्यातील जनतेने खबरदारी घ्यावी, शहरातील व तालुक्यातील  कोरोनाची खरी परिस्थिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी या उद्देशाने दौंड तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.अशोक रासगे व उपजिल्हा रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ.संग्राम डांगे हे दोन्ही अधिकारी वेळोवेळी समाजमाध्यमावर माहिती देत आहेत,त्यामुळे योग्य माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत वेळेवर पोहचत आहे.
         दौंड शहर व तालुक्यात दररोजच कोरोना बाधित रुग्ण सापडायला लागले आहेत, दौंड शहरात प्रत्येक भागात रुग्ण सापडत आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील गावांमध्ये ही कोरोना रुग्ण सापडत आहे, यावरती आळा घालण्यासाठी प्रशासन योग्य ती उपायोजना करत आहेत ,रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांवरती तत्काळ उपचार व्हावेत या हेतूने प्रशासनाने दौंडमधील चार खाजगी रुग्णालय देखील ताब्यात घेतली आहे, यामध्ये व्हेंटिलेटर व इतर आधुनिक उपचार पद्धती राबवून रुग्णांवर उपचार केले जाणार आहे,नगरपालिकेचा आरोग्य विभाग दौंड शहरात योग्य ती खबरदारी घेवून उपाय योजना करत आहेत तर ग्रामीण भागात देखील आरोग्य विभाग योग्य जनजागृती,व उपयोजना राबवत आहे, आपण ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे,योग्य खबरदारी घेऊन,मास्क,सॅनिटायजर,पोलीस प्रशासनाने व आरोग्य विभागाने दिलेले नियम पाळून जीवनशैलीत बदल केला तर लवकरच ह्या कोरोना ला आपण आपल्या परिसरातून घालवू शकतो.
Previous articleइयत्ता 9वी व 11वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यासाठी मुख्याध्यापक संघ महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याला यश
Next articleजुन्नर तालुक्यात कोरोना बळींची संख्या झाली १३ तर एकूण ३७० पॉझिटिव्ह रुग्ण