लाईट सुरुळीत करण्यासाठी मनसेचा आंदोलन छेडण्याचा इशारा

आळंदी – शहरात मागच्या एक महिन्या पासून लाईट वारंवार जात येत आहे. दररोज 4 ते 5 वेळेस लाईट जात आहे .आणि या मुळे रात्रीला चोरीचे प्रमाण हे वाढत आहे. किराणा मालाची दुकाने ,टपरी,घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे व याचा आळंदी शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो

या मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी च्या वतीने मुख्य अभियंता पाटील साहेबाना निवेदन देण्यात आले. येत्या 10 दिवसा मध्ये सर्व प्रश्न मार्गी जर नाही लागले तर मनसे आळंदी च्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या वेळेस निवेदन देताना शहरअध्यक्ष अजय तापकीर , विध्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष मंगेश काळे , उपशहरअध्यक्ष गणेश गायकवाड व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleमहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून पूरग्रस्तांसाठी मदत
Next articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) दौंड शहर व तालुका पदाधिकारी निवड