महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून पूरग्रस्तांसाठी मदत

राजगुरूनगर- महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष कांचन ताई ढमाले यांच्या प्रयत्नाने पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” या मोहिमेअंतर्गत दातृत्व भावनेतून मदत करण्यासाठी केलेल्या आव्हानाला अनेक महिला भगिनींनी मदत केली .सदर मदत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कोकणवासीयां साठी पोहोच केली जाणार आहे

ही मदत गोळा करण्यासाठी आखारवाडी ग्रामपंचायतचे
सौ. मोनिका मुळूक( सरपंच), सौ. निलम मुळूक (सदस्य),सौ. योगिता मुळूक,विठ्ठल मुळूक( उपसरपंच ),अशोक मुळूक, दिगंबर मुळूक,अमर मुळूक, अतुल मुळूक,कु.रोहित मुळूक, सचिन वाडेकर यांच्यासह उद्योजक प्रतापदादा ढमाले ग्रामपंचायत सदस्य सौ. लता ढमाले, सौ. शशिकला ढमाले, सौ. सुलभाताई चिपाडे, सौ. भावनाताई शेंडे, सौ.सविताताई गारगोटे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleकोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
Next articleलाईट सुरुळीत करण्यासाठी मनसेचा आंदोलन छेडण्याचा इशारा