रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) दौंड शहर व तालुका पदाधिकारी निवड

दिनेश पवार,दौंड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए-आंबेडकर दौंड शहर तालुका नवीन पदाधिकारी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व रिपाइं (आंबेडकर) दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

यावेळी राकेश काळे ( दौंड तालुका प्रसिद्धी प्रमुख), सनी गायकवाड (दौंड शहर युवक कार्याध्यक्ष) ,अजित भालेराव (दौंड शहर युवक उपाध्यक्ष), गौतम सोनवणे (दौंड शहर युवक संघटक) ,सुमित कांबळे (दौंड शहर युवक सह संघटक) ,अजय सावंत (दौंड शहर युवक सचिव) पदी निवड करण्यात आली.

निवडी झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज स्मारक व संविधान स्तंभ येथे हार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दौड तालुका उपाध्यक्ष राम देवडे दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी दौंड शहर उपाध्यक्ष ईश्वर सांगळे, दौंड शहर मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, दौंड शहर युवक अध्यक्ष पृथ्वी खंडाळे, दौंड शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले, शशांक भाऊ गायकवाड प्रवीण गुपचे संतोष भोसले, किरण शिंदे रितेश पाटोळे अभिजित यादव राहुल खुडे पिंटू ऋषिकेश पाटोळे व शेकडॊ कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleलाईट सुरुळीत करण्यासाठी मनसेचा आंदोलन छेडण्याचा इशारा
Next articleपूरग्रस्त जोर जांभळी खोऱ्यात मराठी पत्रकार परिषद धावली