शेवाळवाडी येथील कळंबा देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

प्रमोद दांगट , निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेवाळवाडी ता. आंबेगाव येथे असलेल्या कळंबा देवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील २५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना दिनांक 24/7/ 2021 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत नवनाथ बबन डेरे रा. शेवाळवाडी तालुका आंबेगाव यांनी अज्ञात चोरटा विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी नवनाथ ढेरे यांना गावातील देवराम ढेरे यांनी फोन करून सांगितले की आपल्या गावातील ग्रामदैवत कळंबादेवी येथे मी दर्शनासाठी गेलो असता देवीच्या मंदिराचा दरवाजा तुटलेला होता तु लवकर ये त्यावेळी फिर्यादी डेरे हे गावातील ग्रामपंचायत सदस्य मनोज डेरे,पोलीस पाटील अर्जुन थोरात, मार्तंड डेरे , यांना घेऊन घटनास्थळी गेले असता देवीच्या मंदिराचा दरवाज्याचा कडी कोयडा तुटलेला होता. त्यावेळी त्यांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम चोरून नेली होती. तर मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फोडून नुकसान केले होते.त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे चे फुटेज चेक केले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि.24/7/21 रोजी रात्री 10 वा च्या सुमारास मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे 25 हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे दिसले. याबाबत अज्ञात चोरटे विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र हीले करत आहे.

Previous articleमंचर येथे घरफोडी ; 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Next articleशेतीतील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारून जागा बळकवण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल