मंचर येथे घरफोडी ; 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

प्रमोद दांगट

मंचर (ता.आंबेगाव ) गावच्या हद्दीत असलेल्या मंचर लालाबाग प्राइड विंग नंबर 3 पहिला मजला येथील फ्लॅट क्रमांक 112 या बंद असताना अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयडा तोडून फ्लॅटमधील दागिने पैसे कागदपत्रे असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.हि घटना (दि.24) रोजी घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतची फिर्याद विकास सुरेश जाधव ( वय 28 मूळ रा. चाकण ता. खेड जिल्हा पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी हे मंचर येथे राहत असून ते चाकण येथे एका कंपनीत नोकरी करत आहेत.( दि.24 )रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या फ्लॅटच्या शेजारी राहणारे मोरडे यांनी त्यांना फोन करून तुमच्या फ्लॅटचे कडीकोयंडा तुटला असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी जाधव हे घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसते व कपाटातील लॉकर मधील दागिने दिसले नाही .याबाबत त्यांनी आपली पत्नी व आईला फोन करून विचारले असता त्यांनी दागिने कपाटात होते असे सांगितले.

जाधव यांच्या बंद फ्लॅटच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून 50 हजार रुपये रोख रक्कम,50 हजार रुपये रकमेची सोन्याची साखळी, 35 हजार रुपयांचे कानातील कर्णफुले, असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.तसेच जाधव यांच्या शेजारी राहणारी गणेश निवृत्ती वामन यांच्या घराचे दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, गॅस कार्ड, इत्यादी कागदपत्रे चोरून नेले आहेत. घटनेची माहिती कळताच खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शेटे करत आहे.

Previous articleराज्यातील खासगी पशुधन पदाविकाधारक संपावर- उपचारविना जनावरांचे हाल
Next articleशेवाळवाडी येथील कळंबा देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली