राज्यातील खासगी पशुधन पदाविकाधारक संपावर- उपचारविना जनावरांचे हाल

डॉ गोरक्षनाथ सोनवणे

भारत हा कृषिप्रधान देश आहे खेड्यापाड्यातील पशुधनावर मोठ्या प्रमाणावर शेरकर्यांची उपजीविका अवलंबून आहे .पण सध्या राज्यभरात याच पशुधनाची कुचंबणा चालू आहे त्यांचे उपचार वेळेवर होत नाहीत.शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.याचे कारण म्हणजे सध्या पशुधन पदविका धारकांचा राज्यभरात सुरू असलेला संप.राज्यातील खासगी पशुधन पदविका धारक 22 जुलै पासून कामबंद आंदोलन करत आहेत त्यामुळे जनावरांना सेवा मिळणे कठीण झाले आहे.

खेडोपाडी प्रत्येक वेळी सरकारी पदविका धारक उपचारासाठी पोहोचणे अशक्य असते त्यामुळे खासगी पदविका धारक त्यांच्या मदतीला येतात शासनाच्या अनेक योजनांमध्ये ते पुढाकाराने काम करत असतात जसे की जनावरांचे लसीकरण,बिल्ले टोचणे इ.परंतु हेच पदविकाधारक सध्या संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांचे मात्र अतोनात हाल सुरू आहेत सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे.व्यावसायिक नोंदणीसाठी स्वतंत्र कायदा करावा अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी पशुसंवर्धन मंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

 

यावेळी डॉ निवृत्ती पोखरकर, डॉ संजय भोर, डॉ कानसकर ,डॉ भालेराव, डॉ कोल्हे उपस्थित होते

यावर लवकरच कार्यवाही होईल परंतु लवकरात लवकर संप मिटवून घेऊन आमच्या जनावरांचे जीव वाचवावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

Previous articleहोप फाउंडेशन व शतायुषी निसर्ग उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Next articleमंचर येथे घरफोडी ; 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास