होप फाउंडेशन व शतायुषी निसर्ग उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

अतिवृष्टी आणि पुरामुळे बदलापूर, वांगणी, ठाणे जिल्ह्यात प्रचंड हानी झाली आहे. येथील पूरग्रस्त लोकांना व गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. होप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण निचत व त्यांची पत्नी अनुजा निचत व सहकाऱ्यांच्या हस्ते बदलापूर, वांगणी येथील सुमारे तिनशे पूरग्रस्त कुटुंबियांना साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर प्रवीण निचत यांच्या मते फाटलेले आभाळ तर शिवता येत नाही परंतु माणुसकीच्या नात्याने उद्ध्वस्त झालेल्या संसाराला एक आधाराचा हात म्हणून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे केला आहे. त्यांच्या मते अश्या जागरूक लोकांनी माणुसकीची जाण ठेवून सढळ हाताने मदत करायला हवी असे आवाहन केले होते. त्यांनी औषधे, भाजी, चपाती, लोणचे, चटण्या, भातवरण, बिस्किटे, कपडे व इतर काही जीवनावश्यक वस्तू देऊन लोकांची मदत केलेली आहे. कोरोनाच्या काळात जेथे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असून रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम नसल्याने व आता पावसाने थैमान घातल्यामुळे अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करीत आहेत अशा लोकांना फाउंडेशन तर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

होप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण निचत हे बदलापूरचे सुपरिचित निसर्ग उपचार तज्ञ आहे ते घरगुती उपचाराद्वारे व आरोग्य शिबीर द्वारे समाजाची सेवा करतात. नेहमी अशा आपत्कालीन समयी समाजाप्रती जागृकता व जिव्हाळा असणारे डॉक्टर प्रविण निचत व त्यांची धरंमपत्नी सढळ हाताने समाजाला आपला मदतीचा हात पुढे करतात.

Previous articleभवरापूर- सरपंच सचिन सातव तसेच अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण
Next articleराज्यातील खासगी पशुधन पदाविकाधारक संपावर- उपचारविना जनावरांचे हाल