भवरापूर- सरपंच सचिन सातव तसेच अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण

अमोल भोसले,उरुळी कांचन

औषधी वृक्षलागवडीसाठी पालकत्व भवरापूर (ता. हवेली) या ठिकाणी पुणे येथील समीर भाडळे यांनी बहुउपयोगी लक्ष्मीतरु वृक्ष लागवडीसाठी दहा हजार रुपयांची झाडे भेट दिली. जयाप्रभा नर्सरीचे मालक जयामाला जगताप याकडून देण्यात आले आहे. तसेच या वृक्ष भेटीमुळे गावामध्ये संगोपन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १५.५० लक्ष संगोपनासाठी मिळणार आहे.

या औषधी वृक्षामुळे खाद्य तेल व इतर पदार्थ उपलब्ध होणार आहे. आर्ट ऑफ लिविंगचे साधक अजित रणशिंग यांनी सांगितले की, या पुढे समीर भाडळे यांच्या माध्यमातून या गावासाठी दहा हजार वृक्ष देण्याची तयारी दाखवली आहे .गावाने वृक्षलागवड संगोपण करा.
यावेळी भीष्मआर्य स्वामी यांच्याहस्ते वृक्षलागवड करण्यात आली.

भवरापुरचे सरपंच सचिन सातव यांनी मोठया प्रमाणात वृक्षलागवड संकल्प केला आहे. दहा हजार वृक्ष लागवड दोन वर्षामध्ये पूर्ण करू तसेच गावामध्ये विविध योजना आणल्या जाणार आहे .त्याचा उपयोग प्रत्येक कुटुंबातील सदस्यला होणार आहे.

या वेळी शाश्वतविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप यांनी शिंदेवाडी याठिकाणी असणारे वृक्षलागवड व संगोपन संदर्भात माहिती दिली आपल्या गावाप्रमाणे या गावाला मदत करू असे यावेळी सांगितले.

Previous articleप्राणिमित्रांनी वाचवले अपघातात जखमी झालेल्या वानराचे प्राण
Next articleहोप फाउंडेशन व शतायुषी निसर्ग उपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप