प्राणिमित्रांनी वाचवले अपघातात जखमी झालेल्या वानराचे प्राण

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन मध्ये सहा वानर ग्रूप स्थलांतर भटकंती करत आले असता यामधील एक वानर पुणे सोलापूर रोड वर एका मोटारसायकला धडकले असता ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले होते. हि बातमी येथील प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी सुधीर गायकवाड सह सर्पमित्र खलिल शेख यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करुन त्याला वाचवण्यासाठी उपचाराकरीता रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट रेस्क्यू वाईल्डलाईफ सेंटर बावधन याठिकाणी फोन केला.

या परिसरात रेस्क्यू सेंटर नसल्याने बावधन याठिकाण वरुन येईपर्यंत दोन तास वाट पाहावी लागली. रेस्क्यू सेंटर मधील टिम आल्यानंतर दोन तास मुक्याजीवाला वाचवण्यासाठी थरार चालू होता ते स्वतः घाबरुन झाडावर, घरावर लपत होते,त्यामुळे पकडले त्रासदायक व कठीण होतं असतानाच अखेर टीमला यश आले. रेस्क्यू सेंटरचे सोनेश इंगोले, डॉ निकिता मेहता व निशांत या़ंच्यासह प्राणीमित्र, सर्पमित्र उपस्थित होते. या भागात एक रेस्क्यू ऍनिमल सेंटर हवंय आणि एक रेस्क्यू साठी कार असे आवाहन प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी सुधीर गायकवाड यांनी केले. या परिसरात कोणत्याही अनुदानाविना हे कार्य येथील प्राणीमित्र संघटना करत असल्याचे सर्पमित्र खलिल शेख यांनी सांगितले.

Previous articleअनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश
Next articleभवरापूर- सरपंच सचिन सातव तसेच अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण