अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश

नारायणगाव (किरण वाजगे)

नौवरोसजी वाडिया कॉलेज पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात येते. २३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या परीक्षेत श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर शिष्यवृत्ती मिळवली आहे एकूण ७० विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. या परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी दिली.

पुढील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक व्ही. डी. औटी, वैशाली पुंडे, वैशाली मोरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने केले आहे.
या परीक्षेमध्ये आत्मजा आनंद सराईकर या विद्यार्थिनी ने राज्य पातळीवर २७ वा क्रमांक मिळवला. तर तन्वी दिलीप काळे व कौशल साहेबराव गाळव यांनी जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच प्रज्वल राजगुरू, सिद्धी कोल्हे, आराधना बनकर, श्रुती भालेराव, पूजा पाटे, सृष्टी जाधव, अथर्व दानवे, प्रदुम्न शिवणे, विराज रोकडे, आर्यन ढोले, सुयश गुंदेचा, सुयश माताडे, विनया मुथ्था, सोहम काळे, रिया चोरडिया, अथर्व हुलवळे, श्रेयस भालेराव, मृदुला वायाळ, आयुष हांडे, प्रज्ञा हांडे, श्रेया सोमवंशी, ऋग्वेद माळवतकर, मिदहतफातिमा सय्यद, अंशुल खत्री व सुजल ढमाले या विद्यार्थ्यांनी देखील विशेष प्राविण्य मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने केले आहे.

Previous articleराजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा गौरव
Next articleप्राणिमित्रांनी वाचवले अपघातात जखमी झालेल्या वानराचे प्राण