राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

सर्व सामान्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावं लागतं त्यांच्यासाठी एक समर्थ पर्याय सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी आपल्या सहकारी मित्र आणि सभासदाच्या माध्यमातून डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था उभी केली. तसेच संस्थेचा कारभार पारदर्शक असावा यावर सातत्याने भर दिला आहे,तसेच ग्राहकांना अधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी व्यक्त केले.

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोरोनाच्या काळात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार, डॉक्टर तथा कोरोनाच्या काळात कोविड रुग्णांचे अंत्यविधीचे काम करणारे पाच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. तसेच प्रत्येक वार्ड मध्ये औषध फवारणीचे काम करणारे कर्मचारी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन अशा मान्यवरांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच संतोष कांचन, श्रीनाथ म्हसकोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पाडुरंग राऊत, महात्माजी आतमप्रेमानंदजी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता कदम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, सुभाष धुकटे, जनार्धन गोते, प्रकाश जगताप, चंद्रकांत लोणारी, संस्थेचे मुख्य शाखाव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, सह व्यवस्थापक ऋषिकेश भोसलेे, संस्थेचे कर्मचारी – ग्रामपंचायत सदस्य सुुनिल तांबे, आदित्य कांचन, महेश पवार, डॉ समिर ननावरे, संस्थेचे संचालक, ठेवीदार, सभासद, सल्लागार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन छाया काळे यांनी केले .आभार प्रकाश जगताप यांनी मांडले.

Previous articleनारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Next articleअनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश