दावडी गावचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यालयाला एक हजार झाडे भेट

राजगुरूनगर- दावडी गावचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने श्रीमंत महाराजा गायकवाड विद्यालयाला वृक्षारोपणासाठी एक हजार रोपे झाडे भेट दिली


दावडी गावाची वाढती लोकसंख्या पाहता व जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत,वृक्ष संतुलन राखले जावे.पर्यावरण जोपासवे यासाठी आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दावडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळेला झाडे भेट दिली.गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगातसह राज्यातही करोनाने थैमान घातलेले असून करोनच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती.त्याचा विचार करून संपूर्ण मानवजातीने नैसर्गिक संपत्ती जोपासने गरजेचे आहे.या करिता वृक्ष संवर्धन ही खरी काळाची गरज आहे.

यासाठी श्रीमंत महाराजा गायकवाड विद्यालय दावडी शाळेला ,चिंच,लिंब ,अशोका, बदाम, बांबू, सीताफळ, चिकू,ईडलिंबू,आपटा,करंज,गुलमोहर,पेरू, साग, झाडे दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या हस्ते प्राचार्य अंकुश केंगारे यांना भेट दिली.

यावेळी उद्योजक सचिन नवले,सरपंच संभाजी घारे,उपसरपंच राहुल कदम,मा उपसरपंच हिरामण खेसे,आनंदराव तांबे सर, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके,संतोष सातपुते, ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी डुंबरे पाटील,पुष्पा होरे,धनश्री कान्हूरकर,राक्षेवाडी चे पोलीस पाटील पप्पूकाका राक्षे उपस्थित होते.

Previous articleशिरोलीत गायी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना रंगेहाथ पकडले
Next articleउपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन