शिरोलीत गायी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना रंगेहाथ पकडले

राजगुरूनगर – पुणे नाशिक रोडवर शिरोली येथे गायी चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना बंजरंग दलाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पकडून खेड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना (दि.२९ ) रोजी घडली. खेड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप सोपान गावडे (रा. खंडोबाची वाडी, धानोरे, ता.खेड,जि.पुणे ), सोमनाथ शिवाजी चौधरी (रा.मरकळ रोड, घोलप वस्ती आळंदी, ता.खेड,जि.पुणे ) या दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्याजवळ विजय पवळे दोन गायींना चरायला बांधून शेतात काम करत असताना एक गाय सुटल्याने पाहायला चालले असताना पाटीलबुवा सावंत यांच्या शेतात काही व्यक्ती गाईला (MH 14HU2418 ) छोटा हत्ती टेम्पोत भरत असताना त्यांनी पाहिले तात्काळ पवळे यांनी टेम्पो कडे धावत जाऊन आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ व बजरंग दलाचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडून खेड पोलीसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी विजय पवळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस अधिक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास  संदिप भापकर करत आहेत.

Previous articleस्वखर्चाने चाकण तळेगाव रस्त्यावर टाकला भराव
Next articleदावडी गावचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यालयाला एक हजार झाडे भेट