स्वखर्चाने चाकण तळेगाव रस्त्यावर टाकला भराव

चाकण तळेगाव महामार्गावर रानुबाईमळा ते चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तर साइडपट्ट्याही राहिल्या नव्हत्या चिखलातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले होते. सध्या सुरू असलेल्या पावसाने या खड्ड्यात पाणी साठून अपघात घडत होते.शासकीय निधीची वाट न पाहता आमदार दिलीप मोहिते पाटील मित्र मंडळाच्यावतीने स्वखर्चाने जेसीबी व रोलरने साइडपट्ट्या आणि खड्डे मुरूम टाकून डागडुजी केली.

या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश बोत्रे यांच्या सहकार्याने मयूर मोहिते, महेंद्र मेदनकर, जीवन सोनवणे, राहुल नाईकवाडी, विशाल नाईकवाडी, मनोज खांडेभराड,शहराध्यक्ष राम गोरे यांनी काम केले.

सध्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या पूर्णपणे खड्ड्यात गेल्या होत्या. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने चालवणे धोकादायक झाले होते. यामध्ये मुरूम भराव केल्याने रस्त्यावर वाहने चालवणे सोपे झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleपूरग्रस्तांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक हात मदतीचा
Next articleशिरोलीत गायी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना रंगेहाथ पकडले