पूरग्रस्तांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक हात मदतीचा

दिनेश पवार,दौंड

अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या वतीने महाड,चिपळूण, कोल्हापूर, सांगली व इतर ठिकाणच्या पूरग्रस्त जनतेला मदत करण्यात येत आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती एक हात मदतीचा म्हणून मदत करत आहेत.

पूरग्रस्त जनतेला पाण्याचे जार, औषधे, दूध, चटई,कपडे,बिस्कीट, खाण्याचे टिकाऊ पदार्थ, रोगराई पसरू नये म्हणून आवश्यक फवारणी यंत्रणा व इतर गोष्टीची मदत हवी आहे यासाठी सर्वज आपापल्या इच्छेनुसार मदत करत आहेत. समाजातील जास्तीत जास्त जनतेने मदत करावी असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष नंदूनाना जगताप, जिल्हा संघटक विक्रमबाबा पवार, तालुका अध्यक्ष दादासाहेब नांदखिले,शहर अध्यक्ष शैलेश पवार व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.मदत करण्यासाठी 9011143143 गुगल पे द्वारे करावी

Previous articleलेखी आश्वासनानंतर अष्टविनायक मार्गासाठीचे उपोषण मागे
Next articleस्वखर्चाने चाकण तळेगाव रस्त्यावर टाकला भराव