लेखी आश्वासनानंतर अष्टविनायक मार्गासाठीचे उपोषण मागे

दिनेश पवार,दौंड

दौंड शहरातील अष्टविनायक मार्ग हा शासनाच्या नियमानुसार व्हावा,अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढून तो करण्यात यावा या मागणीसाठी दौंड मधील सामाजिक कार्यकर्ते विक्रमबाबा पवार,संजय जाधव,श्यामसुंदर सोनोने यांनी दौंड नगरपरिषद समोर आमरण उपोषण सुरू केले होते ते तहसीलदार (प्रभारी मुख्याधिकारी)दौंड यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे,अष्टविनायक मार्ग हा शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावर असणारी वाहतूक मोठ्याप्रमाणात असल्याने इथे सारखीच समस्या निर्माण होते यामुळे हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे.

 

उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे शासन नियमाप्रमाणे रस्ता अतिक्रमण काढून करण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,गटनेते बादशहा शेख,नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, सचिन कुलथे,आदिनाथ थोरात,दादासाहेब नांदखिले, प्रसाद गायकवाड,सहा. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते

Previous articleउरूळी कांचन येथील स्मशानभूमीत वैकुंठगमन शिल्पाचे अनावरण
Next articleपूरग्रस्तांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक हात मदतीचा