भाजपच्या पुणे जिल्हा सहकोषाध्यक्षपदी श्रीकांत कांचन यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन श्रीकांत ज्ञानदेव कांचन यांची पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी पुणे जिल्हा भाजपच्या सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे, पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडी भाजप अध्यक्ष विकास जगताप, धर्मेंद्र खांडरे, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी आदी उपस्थित होते.


पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वांना विश्वासात घेऊन पार पाडणार तसेच पक्षाचे विचार तळागाळातील नागरिकांच्या पर्यंत पोचविण्याचे काम केले जाईल असे श्रीकांत कांचन यांनी सांगितले.

Previous articleव्यापाऱ्यांवरील निर्बंध मागे घेऊन संपूर्ण वेळ व्यापार करण्याची भाजपची मागणी
Next articleमयुर कांचन यांच्याकडून पुरग्रस्तांना किराणा किटचे वाटप