व्यापाऱ्यांवरील निर्बंध मागे घेऊन संपूर्ण वेळ व्यापार करण्याची भाजपची मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून व्यापाऱ्यांवर संपूर्ण किंवा अंशतः निर्बंध कायम लागू असल्याने व्यापार आणि त्यांचे अर्थकारण प्रचंड अडचणीत आले असल्याने, सरकारने आता त्वरित व्यापार्यांवरील सर्व निर्बंध मागे घेऊन संपूर्ण वेळ व्यापार करण्याची मुभा देण्यात यावी. अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.

तसेच व्यापाऱ्यांसाठी त्वरित आर्थिक दिलासा पॅकेज जाहीर करावे अशा प्रकारचे निवेदन भाजपा व्यापार आघाडीच्या वतीने अप्पर जिल्हादंडाधिकारी पुणे डॉ.जयश्री कटारे यांना भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा व्यापार आघाडी पश्चिम महाराष्ट्र विकास जगताप, भाजपा सरचिटणीस पुणे जिल्हा अविनाश बरवे, भाजपा सहकोषाध्यक्ष पुणे जिल्हा श्रीकांत कांचन यांनी दिले.

Previous articleपूरग्रस्तांना नारायणगावकरांची मदत
Next articleभाजपच्या पुणे जिल्हा सहकोषाध्यक्षपदी श्रीकांत कांचन यांची निवड