पूरग्रस्तांना नारायणगावकरांची मदत

नारायणगाव (किरण वाजगे)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव व शिवसेना शाखा नारायणगाव यांच्याकडून आज महाड, चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्याचे कट्टे व इतर जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आल्या.

याप्रसंगी भर पावसात ट्राफिक पोलीस सेवाकार्य बजावत असतात. नारायणगावात १८ ट्राफिक पोलीस बांधव व होमगार्ड कार्यरत आहेत. त्यांना रेनकोट देखील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले.

यावेळी सरपंच बाबू पाटे यांनी सांगितले की, नारायणगाव हे मदतीसाठी नेहमीच तत्पर असते. मागच्या वर्षी कोल्हापूर याठिकाणी पुर आला असता सुमारे १५ ते १६ लाख रुपयांपर्यंत वस्तू, धान्यरूपी मदत ग्रामस्थांच्या मदतीने पोहचवली होती. त्यावेळी तेथील संपूर्ण गाव स्वच्छ केले होते. त्या ठिकाणी त्या गावातल्या लोकांची ५ दिवसांची जेवणाची व्यवस्था देखील केली होती.सध्या कोरोनाचे सावट असल्याने ज्याला जमेल ती मदत पुढील ३ – ४ दिवसात ग्रामपंचायत येथे जमा करावी. आपण ती मदत घेऊन ज्या गावाला अतीशय गरज असेल अश्या गावांना देणार आहोत असे सांगितले.

यावेळी सरपंच बाबु पाटे यांच्या नियोजनाखाली नारायणगाव मार्फत होणारी मदत संकट काळी नेहमीच होत असते, संकट कुठलेही असो नारायणगावकर त्या संकटाच्या समयी मदतीला धावतोच असे मनोगत सामाजिक कार्येकर्ते सुजित खैरे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, संतोष दांगट, आशिष माळवदकर, दीपक वारुळे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक पृथ्वीराज ताटे , नारायणगाव चे माजी उपसरपंच संतोष वाजगे,सर्व वाहतूक पोलीस, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, उपसरपंच पुष्पा आहेर, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, ज्योती दिवटे, संतोष पाटे, रुपाली जाधव, सुप्रिया खैरे, गणेश पाटे, किरण ताजने, भाग्येश्वर डेरे,, जीतेंद्र गुंजाळ, ललित वाणी आदी मान्यवर, शिवसैनिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleएकलहरे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट
Next articleव्यापाऱ्यांवरील निर्बंध मागे घेऊन संपूर्ण वेळ व्यापार करण्याची भाजपची मागणी