मयुर कांचन यांच्याकडून पुरग्रस्तांना किराणा किटचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपली माणसं संकटात असल्याने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज तसेच राज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जानाई डेव्हलपर्सचे संस्थापक अध्यक्ष सागर पोपट कांचन, उरुळी कांचन ग्रामपंचायतचे सदस्य मयूर पोपट कांचन मित्र परिवार यांच्या माध्यमातून एक हजार जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या किटचे रायगड मधील सात गावातल्या बेघर नागरिकांना किमान पंधरा दिवस पुरेसे साहित्याचे वाटप करुन तेथील भयभीत नागरिकांना दिलासा व आधार देण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून कांचन परिवाराने सामाजिक भावनेतून जोपासला.

२०२० मध्येही कोरोनाच्या काळात दोन हजार ते आडिच हजार नागरिकांना महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूचे किराणा किटच्या माध्यमातून वाटप निरपेक्षपणे भावनेतून केले होते.

याप्रसंगी युवा नेते सागर योगीराज कांचन, मयूर दत्तात्रय कांचन, निखिल मुरकुटे, शुभम संकर, अक्षय वनारसे आदी उपस्थित होते.

Previous articleभाजपच्या पुणे जिल्हा सहकोषाध्यक्षपदी श्रीकांत कांचन यांची निवड
Next articleजुन्नर- वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती