एकलहरे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट

एकलहरे बांगरवाडी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली.त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे उपस्थित होते.

बांगरवाडी येथे डोंगरावर जमीनीला २०० ते २५० फुट भेग पडल्यामुळे जमीन ढासळण्याची शक्यता निर्माण झाली असून,महसुल विभागाने दोन दिवसापुर्वीच स्थळ पहाणी करून येथील तीन कुटुंबाना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना दिल्या होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष भेट दिली.त्यांच्या समवेत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleआईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने सख्या भावाने केलेल्या मारहाणीत भावाचा मृत्यू
Next articleपूरग्रस्तांना नारायणगावकरांची मदत