आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने सख्या भावाने केलेल्या मारहाणीत भावाचा मृत्यू

राजगुरुनगर – खेड तालुक्यातील वाडा येथे सख्या भावाने केलेल्या मारहाणीत सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे .मासे करण्यास नकार दिल्यामुळे ही घटना घडली आहे.या कारणावरून शंकर मारुती वाडेकर (वय५५) यांचा भाऊ राजेंद्र मारुती वाडेकर (वय वर्ष 45 रा.वाडा, ता. खेड) यांने खून केला आहे. ही घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजू मारूती वाडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुटुंब राहत आहे ,शंकर वाडेकर याने मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते, मात्र आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृद्ध आईने मासे शिजवण्यास नकार दिला,याचा राग येऊन शंकर वाडेकर यांनी आईस शिवीगाळ व मारहाण केली.

खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुटुंब राहत आहे, मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते .मात्र आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृद्ध आईने मासे शिजवण्यास नकार दिला याचा राग येऊन शंकर वाडेकर यांनी आई शिवीगाळ व मारहाण केली.शंकर वाडेकर यांचा सख्खा भाऊ राजेंद्र वाडेकर यांना हा प्रकार सहन न झाल्याने शंकर याला पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली.या मारहाणीचा शंकर वाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला .शवविच्छेदन केल्यानंतर नक्की काय प्रकार आहे हे समजेल .असे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव साहेब यांनी सांगितले. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले करत आहेत.

Previous articleपुणे शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७२०० कोटी मंजूर ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleएकलहरे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट