बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने सहा वासरांना मिळाले जिवदान

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील कनेरसर येथून संगमनेर येथे मारूती व्हॅनमधून संगमनेर येथे कत्तलीसाठी चालवलेल्या सहा वासरांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने जिवदान मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कनेरसर येथून  MH १६ R ३५६३ या मारूती ओम्नी चारचाकी गाडीतून कत्तलीसाठी वासरे घेऊन जाणार असल्याची  माहीती मिळताच बजरंग दलाचे गोरक्षक दीपक गावडे, राजेश लांडे, बाली कुलकर्णी, ओंकार सोनार, निकेत आरबुज यांनी सापळा रचून सदरची माहिती पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रुमला कळवून, पोलिसांच्या मदतीने गाडी पकडली, गाडीची पाहणी केली असता गाडीचे मागचे सर्व शीट काढून त्यामध्ये वासरे दाटीवाटीने कोंबलेली दिसली,त्याच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. तसेच गाडी चालकास वासरे कोठे घेऊन चालला आहे विचारले असता ती संगमनेर येथे कत्तलीसाठी घेऊन चाललो असल्याचे सांगितले, सदर चालक मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ कायदा कलम ५अ, ५ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सर्व वासरे भोसरी पांजारपोळ गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहेत.

या कारवाईत गोरक्षा प्रमुख दीपक गावडे, संपर्क प्रमुख राजेश लांडे, सह- गोरक्षा प्रमुख बाली कुलकर्णी, सह-संयोजक ओंकार सोनार, संयोजक अक्षय पऱ्हाड, योगीराज करवंदे, भाजयुमो चे योगेश पवार, रा.स्व.संघाचे सागर तनपुरे, कृष्णा कुलकर्णी, रेटवडी संयोजक अमोल काळे, बंटी हिंगे, निकेत आरबुज, मयूर भगत, भूषण चौधरी, हर्षद चौधरी, ऋतुराज चौधरी, अवधूत साळुंके, पंकज पारखी, राहुल रॉय, धनंजय खोल्लम, संकेत आर्वीकर, तेजस भानुसे यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी दुधाची व्यवस्था करून भुकेलेल्या वासरांना दूध पाजले.तसेच अँड. निलेश आंधळे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

या गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार साबळे हे करत आहेत.

Previous articleवाकळवाडीत आदिवासी ठाकर बांधवांना किराणा माल किटचे वाटप
Next articleसहा महिन्यांपासून फरार असलेल्या खंडणीखोर हरिश कानसकरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या