सहा महिन्यांपासून फरार असलेल्या खंडणीखोर हरिश कानसकरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

किरण वाजगे

मंचर (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकांकडून पैशाची मागणी करून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला  खंडणीखोर हरीश महादू कानसकर (रा.रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

गेली सहा महिन्यांपासून फरार असलेला तसेच वेषांतर करून राहणारा आरोपी हरीश कानसकर याच्यावर खंडणी व इतर स्वरूपाचा गुन्हा मंचर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये एल सी बी चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या टीमने शिताफीने आरोपी कानस्कर याला मुंबई येथील दातिवली, दिवा येथून ताब्यात घेतले. या घटनेची मुंब्रा पोलीस स्टेशन येथे माहिती देऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पो.निरिक्षक नेताजी गंधारे, पो. हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, गायकवाड ,पो.नाईक संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांनी केली आहे.

Previous articleबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने सहा वासरांना मिळाले जिवदान
Next articleपुणे – शिरुर रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७२०० कोटी रू. मंजूर