वाकळवाडीत आदिवासी ठाकर बांधवांना किराणा माल किटचे वाटप

राजगुरूनगर- वाकळवाडी (ता.खेड) येथील ठाकरवाडीमध्ये आदिवासी ठाकर बांधवांच्या ८५ कुटूंबांना साधारण दोन हजार रुपये किंमतीचे किराणा माल किटचे वाटप करण्यात आले.

रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे रणजित पुजारी, रावसाहेब वारुंज, पत्रकार सदाशिव आमराळे, युवा ग्रामपंचायत सदस्या कु.शिवराज्ञी धर्मराज पवळे यांनी गरजू ठाकर बांधवांपर्यंत मदत पोहोचविण्यास पुढाकार घेतला.

सगळ्या प्रकारच्या डाळी, गोडेतेल, साखर, चहापावडर, साबण, राजगीरा लाडू, गहू, तांदूळ आदींचा समावेश असलेले किराणा पॅकेज मिळाल्याने महिला-पुरुषांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते.

यावेळी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष धर्मराज पवळे, खेड ता. खरेदी -विक्री संघाचे मा.संचालक माऊली बांगर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादूशेठ कोरडे, गुरुवर्य पी.डी.पवळे, उपसरपंच जयसिंग पवळे, ग्रामपंचायत सदस्या रुपाली पवळे, रमेशकाका पवळे, बबनराव कोरडे, निवेदक राम वाळुंज, हेमंत (आप्पा) वाळुंज, शिवाजी आगवले, बी.डी.पवळे, निवृत्ती जाधव, कांताराम पडवळ आदि मान्यवर उपस्थित होते.

गुळाणी खिंडीतील जऊळके ठाकरवाडी व गुळाणीमधील झोपड्यांतील गरजूंनाही किराणा किटचे वाटप करण्यात आले.

देवा शिंदे, सोपान भालेकर, शांताबाई पवळे, पी.डी.पवळे, जालिंदर पिंगळे यांनी किराणा वाटप नियोजनद्ध होण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सरपंच मंगल कोरडे, चेअरमन कचरुशेठ पवळे, युवा ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वाळुंज आदिंनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Previous articleपर्यटकांच्या माहितीसाठी वाडा, शिरगाव याठिकाणी लावलेल्या फलकांची दुरावस्था
Next articleबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने सहा वासरांना मिळाले जिवदान