पर्यटकांच्या माहितीसाठी वाडा, शिरगाव याठिकाणी लावलेल्या फलकांची दुरावस्था

राजगुरूनगर- खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असते मात्र या भागातील पर्यटन विकासा बाबत प्रशासनाची उदासीनता नेहमीच दिसून येत आहे परिसरातील पर्यटनाबाबत माहिती देणारे फलक फाटले असून पर्यटन विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे..

पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणाऱ्या धबधब्यांबरोबरच चासकमान धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात फेरफटका मारण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते याशिवाय श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर येत असतात या भागात पावसाळ्यातील सौंदर्याबरोबरच उन्हाळ्यात येथील जंगला मध्ये असलेल्या रानमेवा पर्यटकांसाठी पर्वणी असतो मात्र या पर्यटकांना सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाची नेहमीच उदासीन आता दिसून येत आहे.

पर्यटन विकास महामंडळाकडून या भागात पर्यटकांच्या माहितीसाठी वाडा, शिरगाव याठिकाणी लावलेल्या फलकांची सध्या दुरवस्था झाली आहे तर काही फलक पडले आहेत,काही फलक फाटले आहेत गेले वर्षभरापासून ही स्थिती झाली असूनही महामंडळ त्याकडे दुर्लक्ष करते आहे भोरगिरी सारख्या ठिकाणी महामंडळाकडून पर्यटकांसाठी निवास स्थान बांधण्याची गरज आहे मात्र निवासस्थानाची सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नाईलाजास्तव खाजगी ठिकाणी निवास करावा लागतो आहे.

या भागातील पर्यटन वृद्धिंगत होण्यासाठी निवासाची व्यवस्था, हॉटेल, रानमेवा स्टॉल, पार्किंग, प्रसाधनगृह आदी सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे हे जाण्यास पर्यटनामुळे आदिवासींना रोजगार मिळण्यास मदत होईल.

Previous articleकोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान
Next articleवाकळवाडीत आदिवासी ठाकर बांधवांना किराणा माल किटचे वाटप