कोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान

अमोल भोसले

सामाजिक हित लक्षात ठेऊन समाजातील व्यक्ती व विविध संस्थांनी गेली दोन वर्षापासुन कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अशा संस्थांची दखल सदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान व कलागोविंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले स्तुत्य उपक्रमाचे आयोजन काम करताना निश्चितच पुरस्काराने प्रोत्साहन मिळणार. सर्व नागरिकांनी भविष्यात योग्य ती काळजी घ्यावी राज्य सरकार चांगल्याप्रकारे काम करत असताना जनतेने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य,पर्यावरण या क्षेत्रात कार्य करत असताना रक्तदान, वृक्षारोपण, मास्क व सेनिटायझरचे वाटप, किराणा वस्तुंचे वाटप केलेले आहे. असेच कार्य शिक्षक, हॅप्पी गुप्र, ग्राम स्वच्छता अभियान गुप्र, डाॕक्टर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, पोलीस मिञ, विशेष पोलीस अधिकारी, पञकार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पी.एम.पी.एलचे मांजरी शेवाळवाडी डेपोचे ड्राव्हर कर्मचारी, पोलीस पाटील अशा विविध संस्थांनी तसेच व्यक्तींनी कोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्माननीत करण्यात आले.

याप्रसंगी कोरेगावमुळ ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल शितोळे , हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, उपसरपंच मनिषा कड, ग्रामपंचायतीचे सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेथे, वैशाली सावंत, दत्ताञय काकडे, अश्विनी कड, राधाताई काकडे, सचिन निकाळजे, मंगलताई पवार, शिवसेना नेते दिलीप शितोळे, माजी चेअरमन अमित सावंत, प्राचार्य बबनराव दिवेकर, पोलीस पाटील वर्षा कड, विजय टिळेकर, चंद्रकांत टिळेकर, सरपंच कविता जगताप, सरपंच सुरज चौधरी, कचरु कड ,भाऊसाहेब चौधरी, सुनिल तुपे, शुभम काळे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विशेष सहकार्य उद्योजक ओमसाई अर्थमुव्हर्सचे नंदकुमार कड यांचे लाभले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी केले. सुञसांचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले तर आभार अमोल भोसले यांनी मानले.

Previous articleपुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची साफसफाई
Next articleपर्यटकांच्या माहितीसाठी वाडा, शिरगाव याठिकाणी लावलेल्या फलकांची दुरावस्था