आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील पच्शिम भागात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकवस्तीचे , दळणवळणाच्या साधनांचे,प्राणी तसेच अनेक पिकांचे देखील नुकसान झाले.या नुकसानग्रस्त भागाची आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पाहणी केली.

मंदोशी(जावळेवाडी) येथील पुल अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेला आहे.अनेक ठिकाणी भात शेतीचे सुद्धा नुकसान झाले असून मुक्या जनावरांचे सुद्धा खूप हाल झाले आहेत.यावेळी शेती तसेच झालेल्या इतर नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदतकार्य सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अरुण चांभारे, विठ्ठल वनघरे,दत्ताशेठ खाडे ,लक्ष्मण तिटकारे, शंकर कोरडे,दत्ता पाटेकर ,सौ.शितलताई आंबेकर आदी उपस्थित होते.

Previous articleखेड तालुक्यातील पश्चिम भागात अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Next articleविजेचा शॉक लागून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू