खेड तालुक्यातील पश्चिम भागात अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

खेड – तालुक्यातील पच्शिम भागातील पाईट,आंबोली – वेल्हावळे( काळोखेवाडी) परीसरात झालेल्या अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पश्चिम भागातील पवनचक्की ला जाणाऱ्या रस्त्यामुळे त्या डोंगरातील कड्यांचे पाणी शेतात उलटल्याने अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते परंतु एक शेतकऱ्याच्या वाट्यावर असलेले 4 भात खाचर पैकी 3 खाचरांचे बांध फुटून आणि माती पिकांवर येऊन पिकांचे नुकसान झाले आहे.

सखाराम लक्ष्मण काळोखे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी यावर पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई व्हावी अशी मागणी तेथील स्थानिक शेतकरी करत आहे.

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १५० कुटुंबीयांंना जीवनावश्यक किटचे सरपंच सुरज चौधरी यांच्या माध्यमातून वाटप
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी