उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १५० कुटुंबीयांंना जीवनावश्यक किटचे सरपंच सुरज चौधरी यांच्या माध्यमातून वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्वांना दीड लाख रुपये पर्यंत मोफत उपचार करण्याचा तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे धडकेबाज निर्णय घेतले त्यामुळे आपण या बिकट परिस्थितून चांगल्या प्रकारे सावरलो. कोरोना काळात प्रत्येक निर्णय हा खूपच दूरदृष्टीने घेतला. म्युकर मायकोसिसचा फैलाव होऊ लागतात त्यांनी याबाबत तातडीने माहिती मागवून त्वरित फंड उपलब्ध करून दिला त्यामुळे येणाऱ्या संकटाला तोंड देऊन त्यावर मात करण्यास मदत झाली.तसेच कोरोना काळात मास्क,सिटी स्कॅन, प्लाझ्मा च्या वाढलेल्या किंमती त्वरित खाली आणले असल्याची माहिती पेठ (ता.हवेली) ग्रामपंचायतचे सरपंच सूरज चौधरी यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील वंचित घटकातील सर्व सामान्य नागरिकांना कमीतकमी महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू किराणा किटचे वाटप १५० कुटुंबीयांना पेठ ग्रामपंचायतचे सरपंच सुरज चौधरी यांनी केले.

याप्रसंगी पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम चौधरी, सतिश चौधरी, लखन राऊत उपस्थित होते.

Previous articleराज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन
Next articleखेड तालुक्यातील पश्चिम भागात अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान