विजेचा शॉक लागून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील साळवाडी, बोरी खुर्द येथे कमलजामातानगर मध्ये शेतामध्ये ऊसाला औषध फवारणी करत असताना रविवारी (दि.२५) रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का (शॉक) लागून वडील व मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बोरी खुर्द येथील यादव भिमाजी पटाडे (वय ७०वर्ष) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे( वय३७ वर्ष) हे दोघेजण
आज रविवारी ( दि २५ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत होते. त्यांच्या शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षापासून बंद पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा होत्या वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या पडलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नसायचा परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरू होऊन फवारणी करणाऱ्या यादव पटाडे यांना विजेचा शाॅक लागला. त्यानंतर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मुलगा श्रीकांत पटाडे यांनाही विजेचा जोरदार धक्का बसून त्या दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेत म्रुत्यू पडलेले यादव पटाडे हे वारकरी सांप्रदयात कार्यरत असत. त्यांनी बोरी खुर्द येथील कमलामाता मंदिर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याची सुरवात केली.तर पिंपळवंडी येथील संत सावळेरामबाबा पिंपळवंडीकर पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. तर श्रीकांत हा देखील माळकरी होता त्यांच्या निधनामुळे वारकरी सांप्रदयावर व परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Next articleगारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेले फरार दोघे अखेर जेरबंद