पारधी पाड्यावर वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करणे कौतुकास्पद-महेश ढवान

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेवराई शेवा भावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी पुणेचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील जळगा सुपा येथे वृक्षारोपण व मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला या वेळी महेश ढवान बोलत होते

महेश ढवान पुढे म्हणाले की घराचा प्रमुख होणे सोपे नाही. त्याची स्तिथी पत्र्याच्या शेड सारखी असते.जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, “हा खूप आवाज करतो”. दुस-याच्या दुःख धावुन जातो तोच सेवक. राज्यात पहिल्यांदाच अस काही नावीन्य घडत आहे ज्यांना राहाण्यास घर नाही गावत काबाडकष्ट करुन आपली आपली उपजिवीका भागवत आहे असे गरीबील पारधी समाजातील लोक आज शेवराई शेवा भावी संस्था चे काम महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे, या संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व मिठाई वाटप करून साजरा करतात हे कौतुकास्पद आहे निसर्गाचे जतन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे मत बारामती तालुका पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवान यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, पोलीस निरीक्षक महेश ढवान, जळगावचे पोलीस पाटील, जळगाव ग्रामपंचायतचे सरपंच,सामाजिक कार्यकर्ते संतोष भोसले, शरद भोसले, वकील भोसले, बलवर पवार, कुणाल भोसले, सचिन भोसले, महेश पवार हे उपस्थित होते तर पोलीस पाटील यांनी कार्यक्रमचे आभार मानले.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून पैशाची मागणी
Next articleजेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महान ऋषितुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्व- नार्मन नार्टन