शेख,सय्यद,तांबोळी,काळे,मगर यांची राष्ट्रीय मानवाधिकार पदी निवड

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत च्या पुणे जिल्हा युवा सचिव पदी समीर शेख,पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी आसिफ सय्यद, दौंड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी राजू शेख,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी फिरोज तांबोळी, पुणे जिल्हा वरिष्ठ सचिव पदी शंकर काळे,दुधोडी चे बबन मगर यांची कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष महेश मिना,राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे,राज्य युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अध्यक्ष दस्तगिर इनामदार, प्रदेश कार्याध्यक्ष दीपक खैरे,पुणे जिल्हा मीडिया प्रभारी दिनेश पवार,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबू पासलकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित डाळींबे,दौंड तालुका कार्याध्यक्ष समीर काळे यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला,राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत या संघटनेचे कार्य सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे,अडचणीत असणाऱ्या जनतेला मदत करणारे असल्याने आम्हीदेखील या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्वांच्या हिताचे कार्य करू असे मत नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केले

Previous articleदेऊळगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण अभियान
Next articleमुबंई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून आदिवासी शाळांना डिजिटल टॅबचे वितरण