देऊळगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण अभियान

दिनेश पवार,दौंड

ग्रामपंचायत देऊळगाव राजे व पर्यावरण समिती यांच्या वतीने बकरी ईद च्या मुहूर्तावर देऊळगाव राजे येथील प्रसिद्ध शादवल बाबा(पीर दर्गा)येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले,मा.सरपंच अमित गिरमकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून अभिनव उपक्रमात सहभाग दर्शवला,पावसाळा सुरू झाल्यापासून ग्रामस्थ व पर्यावरण समितीने गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला नि या उपक्रमात गावातील सर्व तरुण वर्ग सहभागी झाल्याने ज्याने-त्याने आपल्या परिसरात तसेच मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून संवर्धनासाठी पाऊल उचलले आहे,

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संवर्धन काळाची गरज,माझे गाव हरित गाव,घर तेथे वृक्ष, एक व्यक्ती एक वृक्ष आशा विविध संकल्पना निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत अशीच संकल्पना देऊळगाव राजे येथे एकात्मिक भावनेने सर्वजण एकत्र येत हाती घेण्यात आली आहे,यावेळी मा.सरपंच अमित गिरमकर, उपसरपंच बाबू पासलकर, मोठया प्रमाणात तरुण वर्ग,पत्रकार, पर्यावरण समितीचे सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleदेशासमोरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना-विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन
Next articleशेख,सय्यद,तांबोळी,काळे,मगर यांची राष्ट्रीय मानवाधिकार पदी निवड