देशासमोरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना-विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन

“तुझे रुप चित्ती राहो..मुखी तुझे नाम” आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशासमोरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वजण सुखी, सुरक्षित व समाधानी व्हावेत हीच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना श्रीक्षेत्र विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी बोलताना सांगितले. प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या श्रीक्षेत्र डाळींब बन येथील श्री विठ्ठलाची महापुजा देवस्थनचे विश्वस्त दत्तू सोपाना म्हस्के यांचे नातू सौरभ धनंजय म्हस्के व क्रांती सौरभ म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाली. कोविडच्या संसर्गामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थित महापूजा पार पडली.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के, सचिव लक्ष्मण म्हस्के, व्यवस्थापक अरूण म्हस्के सर्व विश्वस्त तसेच डाळींबचे सरपंच वनिता धिवार, उपसरपंच पूनम म्हस्के, किसन म्हस्के, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन, बजरंग म्हस्के इत्यादी उपस्थित होते.

Previous articleसराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त
Next articleदेऊळगाव राजे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण अभियान